पुणे शहरातील काही भागांत गुरुवार, शुक्रवार पाणीपुरवठा बंद

बुधवार, 8 डिसेंबर 2021 (21:18 IST)
पुणे  शहरातील काही भागांत गुरुवार, शुक्रवार या दोन दिवसा पाणीपुरवठा राहणार बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.  गुरुवारी वडगाव आणि लष्कर जलकेंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी गुरुवार आणि शुक्रवार दुपारपर्यंत पाणी जपून वापण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.  
तसेच पुण्यातील लष्कर जलकेंद्रात आणि वडगाव येथे  गुरुवारी देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवारी पुण्यातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी दि. 10 डिसेंबर रोजी दुपारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी दीड दिवस पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
वडगाव जलकेंद्र हद्दीतील सिंहगड रस्ता, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, दत्तनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर आणि कोंढवा बुद्रुक याठिकाणी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती