मोशीत झाडाला लटकलेले दोन मृतदेह आढळले

शनिवार, 12 एप्रिल 2025 (18:04 IST)
पुण्यातील मोशी येथे खिरीड वस्ती परिसरात भारतमाता चौकाजवळ शनिवारी 12 एप्रिल रोजी सकाळी एका झाडाला दोन पुरुषांचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भोसरी पोलीस प्रकरणाचा तपास करत असून अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. 
ALSO READ: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची एसआयटी चौकशीची काँग्रेसची मागणी
सदर घटना आज शनिवारी सकाळी भारतमाता चौकाजवळ खिरीड वस्ती परिसरातील आहे. लिंबाच्या एका झाडाला एकाच फांदीला दोन युवकांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले.मयतांची ओळख पटलेली असून दोघेही मित्र होते. तुषार ढगे आणि सिकंदर सल्लाउद्दीन शेख असे यांची नावे आहे. हे दोघे अहमदनगर रहिवासी आहे. हे दोघे कालच मूळ गावावरून पुण्यात आले होते. मयत तुषार ढगे यांच्या चुलत्याला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. 
ALSO READ: पुणे : आईने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या, जुळ्या मुलांना पाण्यात बुडवून केली हत्या
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. दोघांचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या हे समजू शकले नाही. या बाबत अधिक तपास सुरु असून आत्महत्येचा कोणताही निष्कर्ष स्पष्ट झालेला नाही. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: पुण्यात 'ई-फायलिंग' प्रणाली सुरू,वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे 3,560 गुन्हे दाखल

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती