आज आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबईत होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याचा बहिष्कार केला जात आहे. शिवसेना युबीटी ठाकरे गटाने सामन्याचा विरोध दर्शवला आहे. शिवसेना युबीटी गटाकडून आज सामन्याच्या विरोधात राज्यभरात माझं कुंकू, माझा देश आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर पाकिस्तातनातून आलेल्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. भारतात असे हल्ले करणाऱ्यांसोबत या देशाविरोधातील क्रिकेट सामना खेळण्यास कशी परवानगी देतात.
पहलगाम हल्ल्यात सुवासिनींचे कुंकू पुसले गेले. हिंदू संस्कृतीमध्ये कुंकवाचे महत्त्व आहे. या हल्ल्यात नवविवाहितांचे कुंकू पुसले गेले ती तिच्या मृतदेहाजवळ बसली होती.
असे असताना भारत पाकिस्तानसोबत का खेळत आहे. आमच्या कुंकवाची अवहेलना का केली जात आहे. असा सवाल त्यांनी केला.
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुंकू पाठवले आहे. पुण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे आंदोलन लालमहाल येथे सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून कुंकू पाठवले जाणार आहे.