मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथे बुधवारी सकाळी ४ जणांना कार्यालयात घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला आग लागली आणि त्यात बसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी येथे ही दुःखद घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी सकाळी पुण्याजवळ एका खाजगी कंपनीच्या वाहनाला आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या गाडीत कर्मचाऱ्यांचा एक गट बसला होता. टेम्पो ट्रॅव्हलर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात घेऊन जात होता. पण, पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी येथे वाहनाचा अपघात झाला.
या दुःखद घटनेची माहिती देताना हिंजवडीचे पोलिस उपायुक्त म्हणाले की, कर्मचाऱ्यांना कार्यालयात घेऊन जाणारे वाहन डसॉल्ट सिस्टीम्सजवळ असताना अचानक आग लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.