शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्याला प्राधान्य देणार

शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (08:41 IST)
राज्यात शाळा सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.पण शाळा, कॉलेज सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 
 
पुणे शहर आणि जिल्ह्यातील पोझिटीव्हीटी दर कमी झाला आहे,पण सणासुदीच्या काळात गर्दी वाढते,त्यामुळे या काळात कोरोना वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.राज्यात लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी चर्चा सुरू आहे,आदर पूनावाला पुण्यात परत आल्यानंतर यावर निर्णय होईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.जमावबंदी असताना गर्दी होत असेल तर गुन्हे दाखल केले जातात, शासनाच्या नियमावलीचं सर्वांनी पालन केलं पाहिजे.राजकारणी असो वा सामान्य नागरिक नियम सगळ्यांना सारखेच आहेत, तिसरी लाट येऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती