पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप आणि मनोज हे दोघे भाऊ हडपसर या परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहायचे. प्रदीप हा रिक्षा चालवायचा तर मनोज हा खाजगी बसेस साठी काम करायचा. मनोज हा विवाहित असून आपल्या पत्नीसह राहायचा आणि प्रदीप त्यांच्याच सोबत राहत होता हे मनोजच्या पत्नीला आवडत नसे या वरून दोघांचे भांडण व्हायचे. प्रदीप ला चांगले वर्तन नव्हते तो वारंवार भावाकडून पैसे मागायचा. मनोज ने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला,पण त्याचे वर्तन सुधारले नाही त्यामुळे मनोज ने कंटाळून आपल्या लहान भावाचा झोपेतच गळा चिरून खून केला