पुणे विद्यापीठात रामायणात चुकीचे दृश्य दाखवल्यामुळे मारहाण

शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (12:49 IST)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Pune) रामायणावर आधारित सादर करण्यात आलेल्या नाट्यावरून वाद होऊन दोन विद्यार्थ्यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. या नाटकात चुकीचे रामायण दाखवण्यात आले असता भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यानीं  हाणामारी केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून त्यात जब वी मेट या नावाच्या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखविण्यात आले. या नाटकातील संवांदांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला आणि नाटकात काम करणाऱ्यांना मारहाण करण्यात आली. झालेल्या या राडामुळे विद्यापीठात पोलीस लावण्यात आले.  
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती