पुणे सातारा महामार्गावर ट्रक चालकाला एका पेट्रोल पंपावर चक्कर आली आणि त्याच्या ट्रॅकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक चक्क्क डिझेल पम्पावर जाऊन धडकला. सुदैवाने मोठा अपघात होता राहिला. ट्रक आदल्याने पंपाचे मोठे नुकसान झाले आहेत. डिझेल पंप उखडून पडला. हा संपूर्ण अपघात पंपावरील सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाला आहे. पुणे सातारा महामार्गावर खेड शिवापूर हद्दीत कोंडे देशमुख पेट्रोल पंपावर हा अपघात घडला आहे.
या अपघातात पंपावरील कर्मचारी थोडक्यात बचावला आहे. ट्रक चालकाला अचानक आलेल्या चक्करमुळे ट्रकचालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रक तिथे थांबलेल्या चारचाकीला जाऊन धडकला नंतर ट्रक डिझेल पंपावर जाऊन आदळला. या मुळे डिझेल पंप तुटून खाली पडला आणि पंपाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हांनी झालेली नाही. मात्र पंपाचे मोठं नुकसान झाले आहे. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या फुटेज मध्ये दिसत आहे की, एक पांढरी चारचाकी डिझेल भरवत असून मागून एक ट्रक आला आणि त्याने चारचाकीला धडक दिली. आणि ट्रक थेट डिझेल पंपावर जाऊन आदळला. सुदैवाने पंपावरील कर्मचाऱ्याने वेळीच बाजूला होऊन आपला जीव वाचवला. मात्र पंपाचे मोठे नुकसान झाले.