पुण्यात मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्प सुरू झाल्याने डेक्कन ते नारायण पेठेला जोडणार भिडे पूल आता पाडण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या सुशोभीकरण प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुळा-मुठा नदीच्या दोन्ही बाजूंचा पर्यावरणपूरक विकास केला जाणार आहे. टिळक पूल (पुणे महापालिकेसमोरील पूल) ते म्हात्रे पूल दरम्यानचा नदीकाठचा रस्ता कायमस्वरूपी हटवला जाणार असल्याने कोथरूड, सिंहगड रस्ता आणि वारजे येथील नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजे 5,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाचे 11 टप्पे असून संगमवाडी ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा या दोन ठिकाणी अनुक्रमे 351 कोटी आणि 600 कोटी रुपये खर्चून काम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नदी सुधार प्रकल्पासाठी नदीपात्रातील रस्ते बंद करावे लागणार असल्याचे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे.
photo: facebook