पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिपायाचा गळफास

बुधवार, 23 जून 2021 (07:57 IST)
रज्जाक मोहम्मद मणेरी असे या पोलीस शिपायाचे नाव असून तो पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असून त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आहे. रज्जाक यांच्या मृतदेहाजवळ “सॉरी मॉम” (Sorry Mom) असे लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, रज्जाक हा इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवाशी होता. पण गेल्या काही वर्षांपासून तो पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. रज्जाकचे नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून त्याला काही कामानिमित्त फोन करत होते.
 
मात्र तो फोन उचलत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी थेट तो राहत असलेले ठिकाण गाठले. पुण्यातील किकवी या गावी रज्जाक राहत होता. त्या ठिकाणी आल्यानंतर नातेवाईकांना रज्जाक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
 
सुसाईड नोट सापडली
यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर त्यांना मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट सापडली. यात रज्जाकने सॉरी मॉम असे लिहिले होते. तसेच रज्जाकने गळफास घेण्यापूर्वी नसही कापून घेतली होती. त्यानंतर त्याने गळफास घेत जीवनप्रवास संपवला.
तपास सुरु
दरम्यान सध्या या घटनेचा संपूर्ण तपास सुरु आहे. मात्र रज्जाक मणेरी या तरुण पोलीस शिपायाने आत्महत्या का केली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती