मिळालेल्या माहितीनुसार ही घटना २८ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. अश्विनी अभ्यासासाठी लवकर उठली. तिने आंघोळीसाठी हीटर लावून बादलीत पाणी गरम केले होते. या दरम्यान तिला थोडा वेळ झोप लागली. ती उठली तेव्हा पाणी पूर्णपणे उकळले होते. हीटर बंद करून बादली उचलत असताना अचानक तिच्या अंगावर उकळते पाणी पडले आणि पाय घसरल्याने ती खाली पडली. या अपघातात तिच्या शरीराचा सुमारे ८० टक्के भाग भाजला. तिला तात्काळ पिंपरी-चिंचवड येथील डीवाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर अश्विनीचा मृत्यू झाला.