आंतरराष्ट्रीय वेलिंग्टन कॉलेज 2-18 वयोगटातील मुलांसाठी पुण्यात सुरू करणार शाळा

सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:58 IST)
युनायटेड किंग्डम मधील आंतरराष्ट्रीय दर्जाचे वेलिंग्टन कॉलेज आता पुण्यात शाळा सुरू करणार आहेत. यासाठी WCI भारतातील युनिसन ग्रुप यांच्याशी भागिदारी करणार आहेत. 2 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी 2023 पर्यंत ही शाळा सुरु होईल, अशी माहिती समोर आली आहे.  
 
इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, भारतात आम्ही अधिक संख्येने शाळा सुरु करण्याबाबत विचार करत आहोत. यामध्ये सुरवातीला पहिली शाळा 2023 पर्यंत पुण्यात सुरू होईल, दुसऱ्या शाळेची लवकरच घोषणा केली जाईल. दर्जेदार शिक्षण हे आमचे ध्येय असल्याचे युनिसन ग्रुपचे संस्थापक अनुज अग्रवाल यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
 
2 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी 2023 पर्यंत ही शाळा सुरु होईल. या शाळेची 800 विद्यार्थी क्षमता असेल. WCI हा आंतरराष्ट्रीय शाळांचा ग्रुप आहे. 1853 मध्ये ब्रिटीश रॉयल चार्टर अंतर्गत स्थापन झालेल्या वेलिंग्टन कॉलेजची ही एक उपकंपनी आहे. युनायटेड किंग्डम मध्ये अग्रगण्य स्कूलमध्ये याची गणती केली जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती