इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी आणि वापरात वाढ झाली आहे. या वाहनांना आवश्यक चार्जिंगसाठी आता स्वदेशी चार्जर उपलब्ध होणार आहे.पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (ARAI) स्वदेशी प्रोटो टाइप चार्जर सिस्टीम तंत्रज्ञान विकसित केले आहे.हे तंत्रज्ञान भारत चार्जर्स स्टॅण्डर्ड,कॅडेमो,सीसीएस यांच्या तोडीचे आहे. त्यामुळे याद्वारे भारतीय कंपन्यांना आता या स्वदेशी चार्जरचे उत्पादन करता येणे शक्य होणार आहे.
एआरएआयचे संचालक डॉ.रेजी मथाई यांनी याबाबत माहिती देण्यासाठी पौड रोड, कोथरूड पत्रकार परिषद घेतली होती.इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेले चार्जर सध्या आयात करण्यात येत आहेत मात्र केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया या उपक्रमांमध्ये सहभागी होत एआरएआयने लाइट ईव्ही एसी चार्ज पॉइंट तंत्रज्ञान विकसित केले आहे,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.