पुण्यात भरधाव कारने दोघांना उडवलं, आरोपी कार चालक ताब्यात

शनिवार, 6 एप्रिल 2024 (13:13 IST)
सध्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. अपघात रोखण्यासाठी शासन अनेक उपाय योजना करतात तरीही अपघात घडतातच. वाहन चालवताना वेग मर्यादित असावे असे वारंवार सूचना शासन देत असते. तरीही वेगाने जाणारे वाहनांमुळे अपघात होतात. पुण्यात दोन मित्र रात्रीच्या वेळी फेर फटका मारायला निघाले असता त्यांना भर वेगाने येणाऱ्या कारने उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचाराधीन आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली आहे. 

सदर घटना पुण्यातील कोंढव्यातील आहे. मनीष नवनाथ तावरे(17), आणि अजिंक्य केदार पाटील (17) काल  रात्री 10 वाजेच्या सुमारास कोंढवा गेटे येथून रस्त्याच्या कडेने पायी चालत असताना भरधाव येणाऱ्या कारने त्यांना उडवलं ते दोघे हवेत उडून लांबवर फेकले गेले. या मध्ये ते दोघे गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता अजिंक्यचा उपचार करताना मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत गुन्हा दाखल केला सीसीटीव्हीच्या फुटेजच्या साहाय्याने त्यांनी कार आणि कार  चालकाचा शोध घेतला. कार चालकाला शिवणे येथील एका सोसायटीमधून ताब्यात घेतलं आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती