महाराष्ट्र केसरी: अखेर पैलवान सिकंदर शेख ठरला महाराष्ट्र केसरी

शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (20:23 IST)
पैलवान शिवराज राक्षेचा पराभव करत पैलवान सिकंदर शेख याने यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मान पटकवला आहे. यंदाचा महाराष्ट्र केसरी 'किताब पैलवान सिकंदर शेख ने पटकवला आहे. अवघ्या 23 सेकंदात शेख ने 66 वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत करणाऱ्या सिकंदर शेख ने अंतिम फेरी मध्ये प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला अवघ्या 5.37  सेकंदाला झोळी डावावर चितपट केले. आणि महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. 

गेल्यावर्षी देखील महाराष्ट्र केसरी मीच होतो मात्र पंचांनी योग्य निर्णय दिला नाही.असा आरोप त्यांनी केला होता. या वेळी त्याने गतविजेत्या शिवराज राक्षे याला अंतिम सामना खेळून पराभूत करून महाराष्ट्र केसरी झाले आहे. गेल्यावरी मी काही कारणामुळे जिंकू शकलो नाही मात्र या वेळी मी अजून चांगली तयारी केली असून जिंकलो आहे मात्र मला आता देशासाठी मेडल आणायचं आहे. मी गेल्या सात महिन्यांपासून या स्पर्धेची तयारी करत होतो.  

महाराष्ट्र केसरी स्पर्धा प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.फुलगाव सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके उपस्थित होते. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेते सिंकदर शेख यांना थारगाडी, गदा देण्यात आले तर उपविजेते शिवराज यांना ट्रॅक्टर दिले. 
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती