पोटनिवडणूक : भाजपला कसब्यात मोठा धक्का बसला, रवींद्र धंगेकरांचा विजय

गुरूवार, 2 मार्च 2023 (13:16 IST)
पुण्यातील कसबा मतदारसंघातून रविंद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी झाले आहेत. भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपला कसब्यात मोठा धक्का बसला आहे. तब्बल 28 वर्षांनी कसबा मतदारसंघ भाजपच्या हातून गेला आहे.
 
या पोटनिवडणुकीसाठीचं मतदान रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पार पडलं होतं. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती