यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, मी विद्यापीठाचा आभारी आहे आपला मुलगा जिथे शिकला त्याच विद्यापीठातून डी .लिट ची उपाधी मिळणं माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. “खरं तर, मी यापूर्वीच डॉक्टर झालो आहे. छोटी-मोठी ऑपरेशन करत असतो. जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप शिकलो आहे. मला डी लिटची उपाधी देण्याचं ठरवलं या साठी मी विद्यापीठाचा आभारी आहे. ” असेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
आपण घरात बसायचं नाही अशी शिकवण मला बाळा साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कडून मिळाली. आपल्या जबाबदारीचे पालन रोखपणे करत आहोत आणि केलं. मला “कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण पूर्ण करता आलेनाही.ही खंत मनात होती. बीएची पदवी तीन वर्षापूर्वी घेतली. अजूनही पुढं शिकायचं आहे,”असंही शिंदे यांनी म्हटलं. मी जरी मुख्यमंत्री झालो तरीही मी काल देखील कार्यकर्ता होतो आणि उद्याही असणार.