परिसराच्या विकास सुनिश्चित करण्याच्या उद्देश्याने त्यांनी हे पाऊल घेतले आहे. सत्तेत आल्याशिवाय प्रदेशातील विकासाचा वेग वाढवणे अशक्य असल्याचे त्यांच्या समर्थकांना सतत वाटायचे असे ते म्हणाले. तसेच काँग्रेस मध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी शनिवारी प्रदेश काँग्रेसाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा सदर केला.
संग्राम थोपटे यांचे कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाशी जोडलेले आहे. ते ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचे पुत्र आहेत, ज्यांनी भोरमधून सहा वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. पण आता राजकारणाचे हे जुने नाते तोडून संग्राम थोपटे भाजपकडे वळले आहेत. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.