अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत CBIकोठडी

मंगळवार, 31 मे 2022 (22:39 IST)
मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आज सुनावणी केली.
 
अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयकडून काही महिन्यापुर्वी छापेमारी करण्यात आली होती. डीएचएफएल व येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणी अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी झाली होती.
 
बँक फसवणूक प्रकरणी अखेर भोसले यांना सीबीआयने अटक केली. अविनाश भोसले यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 मेपर्यंत त्यांच्या वरळीच्या घरात नजरकैदेत ठेवावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. यानंतर आज झालेल्या सुनावणीत अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती