पुणेकरांसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून 44 बसेस धावणार

शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (08:06 IST)
माजी सैनिक पत्नींच्या संचलित महिला बचत गटाच्या माध्यमातून पुणे शहरात 44 बसेस धावणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. विश्वयोध्दा शेतकरी मल्टी ट्रेड सातारा या कंपनीचे सुरेश गोडसे यांच्या पुढाकारातुन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे या संस्थेच्या 44 बसेस पुणे शहरात धावणार असून याचा शुभारंभ सातारा जिल्हयासह 9 जिल्हयात एकाच वेळी झाला. PMPML सोबत झालेल्या करारानुसार 57 रुपये 17 पैसे प्रति किलोमीटर बसचा करार झाला आहे.
 
महिन्याला 6000 किलोमीटर प्रमाणे याचा फायदा 9 जिल्हयातील माजी सैनिक महिला बचत गटाच्या महिलांना होणार आहे. या कंपनीद्वारे माजी सैनिक संघटनेमार्फत 9 जिल्हयात 44 बचत गटांना एकुण 44 बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बचत गटांना माजी सैनिक कल्याण विभागा तर्फे 3 वर्षे 10 लाखाची सबसिडी दिली जाणार आहे. यामुळे प्रत्येक महिन्याकाठी बसचा सर्व खर्च जाऊन प्रत्येक बचतगटाला 25000 इतके उत्पन्न होणार असल्याची माहिती सुरेश गोडसे यांनी दिली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती