पुण्यातील 22 शाळा अनधिकृत

सोमवार, 23 मे 2022 (11:40 IST)
महाराष्ट्रातील तब्बल 674 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातील 22 शाळा शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाणाऱ्या पुण्यातील आहे. या अनधिकृता शाळांची माहिती आणि यादी शिक्षण विभागाच्या हाती लागले आहे. सोमवारी या शाळांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. परवानगी न घेता अनेकांनी अनाधिकृत शाळा उघडल्या आहे. आणि पालक आणि  विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे. 
 
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, कोणतीही शाळा शासनाचे परवानगी आदेश व ना हरकत प्रमाणात प्राप्त झाल्याशिवाय सुरु करण्यात येत नाही. तसेच अनधिकृतपणे शाळा सुरु ठेवल्यास शाळा व्यवस्थापनला 1 लाख रुपये दंड आणि शाळा बंद करण्याचा सूचना देऊन बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आपले आहे. 
 
पुणे विभाग शिक्षण उपसंचालक म्हणाले की ''शिक्षण अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात 22 अनाधिकृत शाळा असल्याचे समोर आले आहे. या शाळांची यादी सोमवारी प्रसिद्ध केली जाणार असून या अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती