सानिया मिर्झा

नाव- सानिया मिर्झा
जन्म - १५ नोव्हेंबर १९८६ -
ठिकाण- मुंबई
देश- भारत
खेळ- टेनिस
व्यावसायिक पदार्पण- २००३

टेनिसमध्ये भारताचे नाव जगभर पसरविणारी टेनिसपटू म्हणजे सानिया मिर्झा. भारतीय ‍टेनिस म्हटले की फक्त महेश भूपती व लिएंडर पेस यांचीच नावे कायम चर्चेत असत. आता मात्र, यात आणखी एक नाव आले आहे ते सानिया मिर्झाचे. क्रिकेट हा धर्म असणार्‍या भारतासाऱख्या देशात केवळ सानियामुळे टेनिस जाणून घेणार्‍यांची संख्या वाढली हेही मान्य करावे लागेल.

तिने वयाच्या सहाव्या वर्षीपासून टेनिस खेळण्यास सुरवात केली. सानियाने २००३ मध्ये व्यावसायिक टेनिस मध्ये प्रवेश केला. याच वर्षी तिने विम्बल्डनची ज्युनियर स्पर्धा अलिसा क्लेबनोव्हाच्या साथीने दुहेरीत जिंकली. ही स्पर्धा जिंकणारी व ज्युनियर ग्रॅंड स्लॅम खिशात घालणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. २००५ मध्ये हैदराबाद ओपन एकेरी स्पर्धा जिंकून डब्ल्यू. टी. ए. एकेरी स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली.

२००५ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत वाइल्ड कार्डने प्रवेश करणार्‍या सानियाने तिसर्‍या फेरीपर्यंत मजल मारली. तिसर्‍या फेरीत प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. चौथ्या फेरीत तिला सेरेना विल्यम्सकडून पराभव पत्करावा लागला, तरी तिचे नाव जगभर पसरले.

या कामगिरीमुळे तिने आपल्या कारकीर्दीतील सवौच्च अशा ३१ व्या क्रमांकावर मजल मारली, तर दुहेरीत 24 व्या क्रमांकापर्यंत पोहोचली.
आशियाई टेनिस स्पर्धेत ती उपविजेती टरली. सप्टेंबर २००६ मध्ये तिने महिला क्रमवारीत पहिल्या दहामध्ये असणारया रशियाच्या स्वेतलाना कुझ्नेत्सोवा, नादिया पेट्रोवा आणि धककादायक म्हणजे मार्टीना हिंगीसचा पराभव केला.

२००६ मध्ये झालेल्या दोहा आशियाई स्पर्धेत तिने महिला एकेरीचे रौप्य तर दुहेरीत व ‍मिश्र् दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. वडील इमरान मिर्झा तिचे प्रशिक्षक आहेत. तिने आत्तापर्यंत तेरा विजेतिपदे पटकाविली आहेत.

पुरस्कार -
अर्जुन पुरस्कार
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
पद्मश्री (हा पुरस्कार मिळवणारी ती सर्वांत तरूण खेळाडू आहे. वयाच्या १९ वर्षी तिला हा पुरस्कार मिळाला.)

वेबदुनिया वर वाचा