या 4 उपायाने वाढेल आत्मविश्वास

आयुष्यात घडणार्‍या अनेक गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात व कामाच्या ठिकाणीही होत असतो. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देतो. त्यामुळे तुमच्या मनावर झालेला आघात कितीही मोठा असला तरी काही एक्झरसाइज करा व तुमचा आत्म विश्वास परत मिळवा. यासाठी काही उपाय:
स्वत:ची स्तुती करा
दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवा. व्यवस्थित परिधान करा आणि अप टू डेट राहण्याचा प्रयत्न करा. कोणातही काम सोडतं घेऊ नका. पर्फेक्ट माइंडसेटने घराबाहेर पडा. दिवसभरात कोणीही तुमची कश्याबद्दलही स्तुती केली तर आभार माना परंतू गर्व बाळगू नाक.
 
काळजी सोडा
चेहर्‍यावर प्रसन्नतेचा भाव व तेजस्वी हास्य असू द्या. आतून द्वंद असेल तरी ते भाव चेहर्‍यावर येता कामा नये. सर्वांना मदत करा. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. मात्र, चुकत असलेल्यांना पाठीशी घालू नका. अधिक कठोर नाही तरी योग्यरीत्या त्याला मार्गदर्शन करा.
 
चांगली संगत निवडा
तुमचा आत्मविश्वास आजूबाजूच्या लोकांवरही अवलंबून असतो. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. जे लोकं तुम्हाला प्रोत्साहित करत असतील व पडत्या काळात तुमची मदत करत असतील असे लोकं योग्य मार्गदर्शन करतात. ती व्यक्ती कुटुंबातील, मित्र किंवा सहकारी असू शकते.
 
स्वत:साठी वेळ काढा
दिवसभराच्या धावपळीत स्वत:ला काय दिले याचा विचार करा. अर्थात स्वत:ला वेळ द्या. थोड्या वेळासाठी एकांत राहा. स्वत:बद्दल विचार करा. मेडिटेशन करा किंवा स्वत:च्या हॉबीला वेळ द्या. मग बघा आपला आत्मविश्वास कसा वाढतो ते.

वेबदुनिया वर वाचा