मुशर्रफ शेवटच्या क्षणापर्यंत द्विधा मनस्थितीत

एएनआय

मंगळवार, 19 ऑगस्ट 2008 (13:21 IST)
आपल्या राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी देशाला उद्देशून भाषण करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत परवेझ मुशर्रफ हे द्विधा मनस्थितीत होते, असे त्यांच्या काही जवळच्या व्यक्तींचे म्हणणे आहे.

मुशर्रफ राजीनामा देण्याची घोषणा करेपर्यंत इस्लामाबादच्या अध्यक्षीय प्रासादातील वातावरणही अस्वस्थतेचेच होते. राजीनाम्याची कल्पना देण्यासाठी काही निवडक पत्रकारांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनीही मुशर्रफ हे अतिशय तणावात असल्याचे पाहिले.

शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांची द्विधा मनस्थिती होती. लढायचे की पलायन करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता., असे मुशर्रफ यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितल्याचे वृत्त डेली टाईम्सने दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा