चेन्नईत आनंदोत्सव

भाषा

सोमवार, 23 फेब्रुवारी 2009 (14:45 IST)
'अँड ऑस्कर गोज टू ए. आर. रहमान' असे शब्द ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यात जाहीर होताच, इकडे चेन्नईत दुसर्‍यांदा दिवाळी साजरी झाली. फटाक्यांच्या लडी ऑस्करची द्वाही फिरवू लागल्या. तर रहमानच्या चाहत्यांनी शहरभर मिठाई वाटली. त्याच्या घराभोवती तर आनंदोत्सवच सुरू होता.

चेन्नईत कोडांबक्कम येथे रहमानच्या घरासमोर प्रचंड मोठा केक ठेवण्यात आला होता. पुरस्कार मिळाल्याचे कळताच रहमानच्या कुटुंबियांनी तो केक कापला. यावेळी मोठी फटाक्यांची माळ फोडण्यात आली. कॉलेजच्या युवकांनीही शहरभर रहमानच्या ऑस्करचे सेलिब्रेशन सुरू केले. सगळीकडे मिठाई वाटली जात होती. केक कापले होते. 'टॉलीवूड'मधील कलावंतांनीही रहमानने 'हॉलीवूड'मध्ये कमावलेल्या यशाला सलाम केला.

रहमानची बहिण रहात असलेल्या विरूगमबक्कम भागातही असाच आनंदोत्स व साजरा झाला. मी त्याचे नाव कधी जाहीर होईल, याच्या प्रतीक्षेत होते. त्याच्यासाठी मी देवाकडे प्रार्थनाही केली होती, असे रहमानची बहिण रेहाना यांनी सांगितले. रहमानने तिथ जाऊन तमिळमध्ये बोलावे अशी माझी अपेक्षा होती. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने ती पुरी केली याचा आनंद आहे, असेही रेहाना म्हणाल्या.

वेबदुनिया वर वाचा