लक्ष्य सेनने बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली असून, अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. लक्ष्यने तैवानच्या चू टिन चेनचा 19-21, 21-15, 21-12 असा पराभव केला. लक्ष्य सेनने भारतीय बॅडमिंटनमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चू टिन चेनविरुद्ध तीन गेमच्या रोमहर्षक विजयासह, सेनने असा टप्पा गाठला आहे जिथे यापूर्वी कोणताही भारतीय पुरुष शटलर पोहोचू शकला नाही. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा लक्ष्य आता पहिला भारतीय पुरुष शटलर ठरला आहे.
लक्ष्याने प्रणॉयला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, तर लक्ष्य सेनचा सामना एचएस प्रणॉयशी झाला होता. गुरुवारी झालेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यने 13व्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयचा पराभव केला. यासह प्रणयचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपला. या सामन्यातील पहिला सेट लक्ष्यने जिंकला.