भारतीय हॉकी संघाने 52 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे. शुक्रवारी भारतीय संघाच्या कर्णधाराच्या दोन गोलमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघ अंतिम 8 मध्ये पोहोचला आहे. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के केले.