मेहरा ऑलिंपिक व्यवस्था पाहणीसाठी बिजींगमध्ये

चीनमध्ये सुरू असलेल्या ऑलिंपिकच्या व्यवस्थांची पाहणी करण्यासाठी दिल्लीच्या महापौर आरती मेहरा यांना बिजींगमध्ये पाठवण्याचा निर्णय राष्ट्रकुल समितीने घेतला आहे.

2010 मध्ये भारत राष्ट्रकुल स्पर्धांचे यजमान पद भूषवणार आहे. अशात चीनमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेतील व्यवस्थापनाचा अभ्यास करू त्या विषयाचा अहवाल भारतीय राष्ट्रकुल समितीला पाठवण्याची जबाबदारी मेहरांवर सोपवण्यात आली आहे.

सात ते नऊ ऑगस्ट दरम्यान मेहरा बिजींग ऑलिंपिकचे अध्ययन करणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा