नेमबाजांवर अपेक्षांचे सर्वाधिक ओझे

बिजींग ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय चमू बिजींगमध्ये डेरे दाखल झाला आहे. या 57 सदस्यीय संघात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. परंतु भारतीय नेमबाजांकडून देशातील नागरिकांसह भारताच्या अनेक हितचिंतक क्रीडा प्रेमींनाही आशा आहेत.

पदक तालिकेचा विचार करता राजवर्धन राठोड आणि अंजली भागवत सह, मनशेर सिंह, गगन नारंग, अवनीत कौर, अभिनव बिंद्रा, संजीव राजपूत, समशेर जंग आदी खेळाडूंकडून पदकाची अधिक अपेक्षा आहे.

समशेर जंगने मेलबॉर्न राष्ट्रकुल खेळांमध्ये पाच सुवर्ण पदके आपल्या नावावर केली आहेत, त्यामुळे त्याच्याकडून भारतीयांना अधिक आशा आहेत. असेच राज्यवर्धन राठोड आणि अंजली भागवतही सध्या चांगल्या फॉर्मात असल्याने त्यांच्यावरही अपेक्षांचे ओझे आहे.

समशेरला लहानपणापासूनच या खेळात महारत हसिला आहे. त्याला लहानपणापासूनच नेमबाजीची आवड असल्याने तो आज या जागी असल्याचे त्याची आई म्हणते.

वेबदुनिया वर वाचा