भारतीय निशाणेबाज गगन नारंग आणि संजीव राजपूत यांनी 29 व्या ऑलम्पिक खेळांमध्ये अत्यंत निराशाजनक खेळ केला आहे. या दोघांना 50 मीटर रायफल थ्री पोजीशन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचणे अशक्य ठरले असून दोघेही उपांत्य सामन्यात पराभूत झाले आहेत.
हैदराबादचा नारंग 1168 या आपल्या सर्वश्रेष्ठ गुणांनंतरही 49 निशानेबाजांमध्ये 13 व्या क्रमांकावर राहिला आहे. तर आपल्या पहिल्याच ऑलम्पिकमध्ये उतरलेला राजपूत 1162 गूण बनवून 26 व्या क्रमांकावर राहिला.
या स्पर्धेतील सुवर्णपदक चीनच्या खियु जियान याने 1272.5 गूण मिळवून केले. तर युक्रेनचे जूरी सुखोरुकोव 1272.4 याने रजत तर स्लोवाकियाचा राजमंड देबेवेच 1271.7 याने कांस्य पदक जिंकले आहे.
नारंगने प्रोनमध्ये 394 स्टॅंडिंगमध्ये 389 आणि नीलिंगमध्ये 384 गूण बनविले. नीलिंगमध्ये कमकुवत ठरल्याने त्यांना अंतिम सामन्यात स्थान मिळविता आले नाही.