ऑलम्पिकमध्ये लिएंडर पेस आणि महेश भुपती या भारतीय जोडीने दुहेरी टेनिस सामन्यात पहिल्या फेरीचा सामना जिंकला असून क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश मिळविला आहे.
या जोडीने फ्रांन्सच्या जील सिमॉन आणि मॉनफील या जोडगोळीचा 6-3, 6-3 ने पराभव केला. या विजयानंतर महेश आणि लिएंडर ही जोडी क्वॉर्टरफायनलमध्ये पोचली आहे. तेथे त्यांचा ब्राझीलच्या जोडीशी सामना होईल.