कुस्तीत योगेश्वर दत्तचा पराभव

वार्ता

मंगळवार, 19 ऑगस्ट 2008 (12:28 IST)
ऑलिंपिकच्या उप उपांत्य फेरीत धडक मारलेल्या भारतीय कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा जपानच्या केनेची सुमोतोने धूळ चारल्याने भारतीयाच्या कुस्तीतील आशाही अखेर संपुष्टात आल्या.

दत्तने सुरुवातीच्या दोन राऊंडमध्ये केनोचीला चांगलेच पछाडले होते. परंतु अखेरच्या राऊंडमध्ये केनेचीने त्याला धूळ चारली. या सामन्यात जर दत्त विजयी झाला असता तर भारतासाठी एक पदक निश्चित मानले जात होते. या राऊंडमध्ये येण्यासाठी दत्तने कजाकिस्तानच्या बरजान ओरागालिऐबचा 3-1 ने पराभव केला होता.

वेबदुनिया वर वाचा