इतिहासला सर्वांत महागडा उद्‍घाटन समारंभ

भाषा

शुक्रवार, 8 ऑगस्ट 2008 (11:53 IST)
बीजिंग- कडव्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेत चीनच्‍या संस्कृतीचा वारसा सांगत सुरू होणा-या ऑ‍लम्पिक उदघाटनाचा समारंभ आजवरचा सर्वाधिक महागडा उत्‍सव राहणार असून या भव्‍यदिव्‍य आणि महागडया समारंभासाठी सुमारे 50 हजार कोटी डॉलर खर्च केले जात आहेत. या समारंभासाठी जगभरातील प्रमुख नेत्‍यांची उपस्थिती असणार आहे.

पक्ष्‍याच्‍या घरटयाच्‍या आकाराच्‍या 'बर्ड नेस्ट' स्टेडियममध्‍ये होणा-या या समारंभासाठी बिजींगसह संपूर्ण चीन सजले आहे. या सोहळयाकडे संपूर्ण जगाचे बिजींगकडे लक्ष लागले आहे. सुमारे साडेतीन तास चालणा-या उदघाटन समारंभातून 5000 वर्ष जुन्‍या चीनी संस्‍कृतिचा इतिहास त्‍यातून दाखविला जाणार आहे. दारूगोळयांचा वापर करून आकर्षक नक्षीकाम करणा-या या सोहळयासाठी रंगीबेरंगी वेशातील कलाकार नृत्‍य करणार आहेत.

समारंभातील कार्यक्रम पत्रीका गोपनीय ठेवण्‍यात आली असून ती कुणालाही लीक न करण्‍याच्‍या स्‍पष्‍ट सूचना कलाकारांना देण्‍यात आल्‍या आहेत. वेस्टएंड स्टार सारा ब्राइटमॅन आणि चीनचा लोकप्रिय गायक लियू हुआन उदघाटन समारंभात गायन करणार आहे.

साडेतीन तासांच्‍या या समारंभात चीनच्‍या पारंपरिक ड्रम फूच्‍या ठेक्‍यासह उदघाटन होईल. त्‍यानंतर ऑलंम्पिक सर्कल आणि चीनचा राष्ट्रध्वज फडकाविला जाणार आहे. समारंभ रात्री 8 वाजून 8 मिनटांनी सुरू होईल. 2008 च्‍या 8 व्‍या महीन्‍याच्‍या 8 व्‍या दिवशी हा कार्यक्रम होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा