आपल्‍यावर आरोप करणा-यांना शिक्षा द्याः मोनिका

भाषा

बुधवार, 20 ऑगस्ट 2008 (12:33 IST)
PTI
डोपिंग टेस्टमध्‍ये अयश्‍स्‍वी ठरल्‍याचा आरोप लावून बिजींग ऑलम्पिकमधून मला बाहेर पाठविण्‍याचा डाव रचणा-या अधिका-यांची चौकशी करून त्‍यांना शिक्षा द्या अशी मागणी भारोत्तोलक मोनिका देवी हिने केली आहे. आपल्‍यावर अन्‍याय करणा-या या अधिका-यांना जोपर्यंत शिक्षा केली जात नाही तोपय्रंत कुठल्‍याही राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धेत सहभाग घेणार नाही असा पवित्राही तिने घेतला आहे.

69 किलो वर्ग गटातील भारोत्तोलक मोनिकाने आपण खेळांमध्‍ये राजकारणाचा बळी ठरल्‍याचा आरोप केला आहे. तिच्‍या सन्‍मानार्थ आयोजित कार्यक्रमात तिने राज्‍यातील लोकांचे आभार मानतानाच आगामी स्‍पर्धांमध्‍ये सहभाग न घेण्‍याचे जाहीर केले आहे. तिच्‍या समर्थनार्थ मणिपूरमध्‍ये बंद पाळण्‍यात आला होता.

मोनिका डोपिंग आरोपातून मुक्‍त, बिजींग जाणे अशक्‍य

मोनिका प्रकरणाच्‍या चौकशीची मागणी

वेबदुनिया वर वाचा