पृथ्वीवरील सर्वात मोठे खेळांचे आयोजन असलेल्या ऑलिंपिकमध्ये जगभरातील 205 देश सहभागी होत असून, 302 सुवर्ण पदकांसाठी त्यांच्यात तुंबळ स्पर्धा होणार आहे.
या देशांचे 10500 स्पर्धक आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. आठ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून या खेळांना सुरुवात होत आहे. खेळांच्या या महायुद्धात यजमान चीनचे 639 खेळाडू आहेत. चीन पाठोपाठ 596 अमेरिकन खेळाडू आपापसात भिडणार आहेत.
चीन आणि अमेरिकेच्या या शक्ती प्रदर्शनाने यावर्षीच्या ऑलिंपिकमध्ये अधिक चुरस निर्माण झाली आहे. चीन गेल्या एथेंस ऑलिंपिकमध्ये पदक तालिकेत अव्वल स्थानावर होते. आता अमेरिका आणि चीन यांच्यात प्रथम स्थान पटकावण्याची चुरस लागली आहे.
या पाठोपाठ रशियानेही आपल्या 467 जणांच्या चमूला शुभेच्छा दिल्या असून, रशियन खेळाडूंशी स्पर्धा करणेही अवघड बाब आहे. रशियानंतर नंबर लागतो तो जर्मनीचा जर्मनीने यंदा 439 जणांचा चमू ऑलिंपिकसाठी पाठवला आहे.
यानंतर नंबर लागतो तो जपान 351, इटली 344, कॅनडा 331, फ्रान्स 323, ब्रिटेन 313, स्पेन 287, ब्राझील 277, पॉलंड 268, दक्षिण कोरिया 267 आणि हॉलंड 245, भारताचा 57 जणांच्या चमूचाही यात समावेश असून, त्यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.