बिजींग ऑलिंपिकमध्ये पदक तालिकेत भारतीयांना ज्या खेळाडूंकडून अधिक अपेक्षा आहे, त्या बॅडमेंटनपट्टू अनुप श्रीधराने आपण विजयश्री खेचून आणून असे आश्वासन दिले आहे. मी ऑलिंपिकमध्ये फक्त विजयासाठीच आलो असल्याचे तो म्हणाला.
ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे ही गौरवाची बाब असल्याचे सांगतानाच आपण भारतीयांना नाराज करणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
या स्पर्धेसाठी कोणतीही रणनीती तयार केली नसून स्पर्धेतील इतर देशांच्या स्पर्धकांना कमी लेखने चुकीचे असल्याचेही त्याने स्पष्ट केले. ऑलिंपिक ड्रॉ वर नाराज होण्यासारखे कोणतेही कारण नसून, याने आपला उत्साह आणखी वाढल्याचे त्याने स्पष्ट केले.