नेहा टे.टे. एकेरी स्‍पर्धेतून बाहेर

भाषा

मंगळवार, 19 ऑगस्ट 2008 (15:37 IST)
ND
ऑलम्पिक खेळांमध्‍ये सोमवारचा दिवस भारतासाठी निराशा जनकच राहिला. टेबल-टेनिसच्‍या स्‍पर्धेत नेहा अग्रवालचे आव्‍हान पहिल्‍याच फेरीत संपुष्‍टात आले तर दूस-या आणि तिस-या उडीत भारताचा रंजीत माहेश्वरी 35 व्‍या क्रमांकावर राहिला. मंगलवारी एथलेटिक्समध्‍ये अंजू बॉबी जॉर्ज हिची लांब उडीच्‍या स्‍पर्धा असणार आहे. त्‍याकडे आता नजरा लागल्‍या आहेत.

पहल्‍यांदाच ऑलम्पिकमध्‍ये उतरलेली नेहा अग्रवाल हिचे आव्‍हान केवळ 34 व्‍या मिनटातच संपुष्‍टात आले. भारताची एकमेव महिला टेबल-टेनिस खेळाडू चांगल्‍या सुरुवातीनंतरही थकलयाने पहिल्‍याच फेरीत पराभूत झाली. तिचा सामना तिच्‍यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्‍या चीनमध्‍ये जन्‍मलेल्‍या ऑस्ट्रेलियन खेळाडू जियांग फांग हिच्‍याशी झाला. तिने तिला 10-12, 11-8, 13-11, 11-8, 11-4 ने सहज पराभूत केले.

वेबदुनिया वर वाचा