जितेंद्रचे आव्‍हान संपुष्‍टात

वेबदुनिया

बुधवार, 20 ऑगस्ट 2008 (17:17 IST)
भारतीय बॉक्सर जितेंद्रकूमार बुधवारी सायंकाळी झालेल्‍या उपउपांत्‍य सामन्‍यात रशियाच्‍या बॉक्‍सरकडून 15-11 पराभूत झाला आहे. बॉक्सिंग संघातला वरिष्‍ठ खेळाडू अखिलकूमार याचे आव्‍हान सोमवारी संपुष्‍टात आल्‍याने आता त्‍याच्‍याकडून अपेक्षा होत्‍या. आता सर्वांच्‍या नजरा विजेंद्रच्‍या सामन्‍याकडे लागल्‍या आहेत.

51 किलोग्राम फ्लायवेट गटातला जितेंद्र तीन वेळा युरोपीयन स्‍पर्धांमध्‍ये चॅम्पियन ठरलेल्‍या रशियाच्‍या ग्रेगरी बलाकशीनशी लढला. या सामन्‍यात त्‍याचा 15-11 ने पराभव झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा