बिजींग ऑलम्पिक खेळांमध्ये कुस्तीच्या खेळात पहिल्या दिवशी ग्रीको रोमन शैलीत भरपूर उलाढाली झालेल्या दिसल्या. तीन वेळा जागतिक विजेता ठरलेला ईरानचा हामिद सोरयान, दोन वेळा ऑलम्पिक चॅम्पियन असलेल्या बुल्गारियाच्या आर्मेन नजारियन (60 किलो), जार्जियाच्या डेव्हीड बेडिनादजे आणि मागच्या वेळचा चॅम्पियन दक्षिण कोरिकाचा जंग जी हयुन यांना पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले.
अजरबेजानचा वितालिये राहीमोव याला 60 किलो वजन वर्गात कठीण ड्रॉ मिळाला होता. मात्र त्याने सर्वांना पराभूत करीत फाइनलमध्ये प्रवेश केला आहे. तेथे त्याची सुवर्ण पदकासाठी रशियाच्या इस्लाम बीका अल्बीबशी लढत होणार आहे.