ऑलिंपिक संघातही रेल्वेचाच बोलबाला

अत्यंत बिकट परिस्थिती आली असताना आता फायद्यात आलेल्या भारतीय रेल्वेचा बोलबाला आता भारतीय ऑलिंपिक चमूतही दिसून आला आहे. ऑलिंपिकमध्ये सहगाभी होण्यासाठी गेलेल्या 57 जणांच्या भारतीय संघात 15 खेळाडू एकट्या रेल्वेचे आहेत.

रेल्वेशी निगडित असलेल्या खेळाडूंमध्ये, डोला बॅनर्जी, यल बोबयाला देवी, मंगल सिंह, चंपिया, रंजीत माहेश्वरी, कृष्णा पुनिया, जे जे शोभा, सुष्मिता सिंह राय, जी जी प्रमिला, आदींचा समावेश आहे. काही पहेलवान आणि बॉक्सिंग खेळाडूही रेल्वेशीच निगडित आहेत.

वेबदुनिया वर वाचा