'ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याची क्रिकेटची लायकी नाही'

भाषा

रविवार, 17 ऑगस्ट 2008 (12:59 IST)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि ऑलिंपिक समितीने, ऑलिंपिकमध्ये सहभागी करून घेण्यासाठी क्रिकेटला हिरवा कंदील दिला असला तरी, काही माजी जगज्जेत्या खेळाडूंनी यावर नाराजी व्यक्त करत ऑलिंपिकमध्ये क्रिकेटला सहभागी करून घेण्याची लायकीच नसल्याचे म्हटले आहे.

ऑलिंपिक जगज्जेते लेनफोर्ड क्रिस्ती यांनी दोनही समित्यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. क्रिकेट हा असभ्य लोकांचा खेळ असल्याची जहाल टीकाही त्यांनी केली आहे.

ऑलिंपिकमधील प्रत्येक खेळासाठी सरावाची नितांत आवश्यकता असते, क्रिकेटचे असे नाही. हा वैयक्तिक खेळ नाही, आणि क्रिकेट ऑलिंपिकमध्ये घुसले तर इतर खेळांचे महत्त्व कमी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

क्रिस्टी हे ब्रिटनचे एकमेव असे खेळाडू आहेत, ज्यांनी ऑलिंपिकमध्ये एथेलेटीक्स या विभागत ब्रिटेन कडून खेळताना सुवर्णपदक मिळवले आहे.

वेबदुनिया वर वाचा