तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी प्रार्थना करून शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या बीजिंग ऑलिंपिकच्या यशस्वितेसाठी शुभकामना दिल्या आहेत. चीनचे नागरिक, आयोजक व स्पर्धेत भाग घेणाऱ्या अॅथलिटसना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑलिंपिक स्पर्धा घेण्यासाठी चीनने दावेदारी दाखल केल्यापासून आयोजनासाठी चीनच्या दावेदारीचे आपण समर्थन केले आहे. एकशे तीस कोटी चिनी जनतेसाठी हा गौरवाचा क्षण आहे. स्पर्धेतून मित्रत्व, मुक्त विचार व शांततेचा संदेश पसरवण्यासाठी फायदा व्हावा.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आपण प्रार्थना व अभीष्टचिंतन करत असल्याचा नोबेल विजेते लामा यांनी दिला आहे. तिबेट प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लामांचे समर्थकांनी शांततामय मार्गाने तीव्र आंदोलन छेडले असताना हा संदेश आला आहे.