अब्जावधी लोकांनी पाहिला ऑलिंपिक उद्घाटन सोहळा

भाषा

रविवार, 17 ऑगस्ट 2008 (13:07 IST)
चीनमध्ये सुरू असलेल्या बीजिंग ऑलिंपिक सोहळ्याच्या उद्घाटन समारोहाला 'याची देही याची डोळा' पाहणाऱ्यांची संख्या अब्जावधीत असून, यात अनेक देशांनी चक्क अनधिकृत वेबसाइटचा वापर केल्याची माहिती आता चीनच्या कॉपीराइट खात्याने दिली आहे.

हा सोहळा प्रत्यक्ष बर्ड नेस्ट मैदानावर पाहणाऱ्यांची संख्या तर अधिक होतीच परंतु यासह विविध देशांमध्ये याचे अधिकृत प्रक्षेपणही करण्यात आले, शिवाय 1600 हून अधिक अनधिकृत वेबसाईटसनेही हा सोहळा दाखवल्याची माहिती चीनच्या कॉपीराइट विभागाचे मंत्री यान शियोहॉंग यांनी दिली आहे. चीन सरकारने अशा सर्व संकेतस्थळांवर लक्ष ठेवले होते असेही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा