सॅमसंगचे दोन स्मार्टफोन स्वस्त झाले, नवीन किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
शनिवार, 2 मे 2020 (16:33 IST)
लॉकडाऊनच्या काळात एक दिलासादायक बातमी म्हणजे सॅमसंग कंपनीने आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. Samsung Galaxy M21 आणि Samsung Galaxy A50s या दोन स्मार्टफोनच्या किंमती कमी झाल्या आहेत.
Samsung Galaxy M21 आणि Samsung Galaxy A50s
Samsung Galaxy M21 या फोनच्या किंमतीत 1 हजार 23 रुपयांची कपात तर Samsung Galaxy A50s या स्मार्टफॅनच्या किंमतीत चक्क 2 हजार 417 रुपये कमी करण्यात आले आहेत. नवीन किंमत सॅमसंगच्या साईटवर बघायला मिळतील.