सॅमसंग गॅलक्सी S8 आणि S8 प्लसचे खास फीचर्स:
सॅमसंग गॅलक्सी S8 मध्ये 5.8 इंच आणि गॅलक्सी S8 प्लसमध्ये 6.2 इंच डिस्प्ले आहे. याचं रेझ्युलेशन 1440×2960 पिक्सल आहे. या स्मार्टफोनचे कर्व्ह्ड एज देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये इनव्हिजिबल होम बटण देण्यात आलं आहे. डिव्हाईसच्या रिअर पॅनलच्या कॅमेऱ्याखाली फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलं आहे.
गॅलक्सी S8 मध्ये 3,000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर S8 प्लसमध्ये 3,500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.