सॅमसंगकडून आता गॅलक्सी नोट ७ मधील स्फोटाची कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. फोनमधील दोष आणि अंतर्गत कारणांमुळे बॅटरी स्फोटाची समस्या उद्भवली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. या स्फोटामागे इंटर्नल शॉर्ट-सर्किटची समस्या देखील कारणीभूत असल्याचे सॅमसंगने स्पष्ट केले आहे.