Realme Narzo 50 Series: 50MP कॅमेरा असलेला फोन आज भारतात येत आहे, जाणून घ्या किंमत व फीर्चर्स

शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (18:40 IST)
चिनी स्मार्टफोन निर्माता Realme आज आपली नवीन Narzo 50 मालिका लाँच करणार आहे. या मालिकेसह, Realme Real TV Band 2 सोबत Smart TV Neo TV देखील लॉचं करेल. येथे आम्ही तुम्हाला Realme Narzo 50 मालिकेबद्दल सांगत आहोत. जाणून घेऊया Realme Narzo 50 मालिकेची संभाव्य वैशिष्ट्ये.
 
Realme Narzo 50 मालिकेची संभाव्य स्पेसिफिकेशन्स:  
या मालिकेअंतर्गत Realme Narzo 50A आणि Realme Narzo 50i स्मार्टफोन लाँच केले जातील. जर आपण realme narzo 50A बद्दल बोललो तर त्यात 50MP AI ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. तसेच MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला असेल. यात 12 एनएम ऑक्टा-कोर, एआरएम कॉर्टेक्स-ए 75, एआरएम माली जी 52 सारखी वैशिष्ट्ये दिली जातील. त्याचबरोबर 6000 mAh ची बॅटरीही दिली जाऊ शकते. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याचा प्राथमिक सेन्सर 50 मेगापिक्सेलचा असेल. त्याच वेळी, उर्वरित दोन 2 मेगापिक्सेलचे असतील. कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर त्यात सुपर नाईटस्केप मोड दिला जाऊ शकतो.
 
Realme Narzo 50 च्या टीझर पेजवरून समोर आले आहे की फोनमध्ये वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. आयताकृती कॅमेरा मॉड्यूल फोनमध्ये देण्यात आला असेल. फोनमध्ये तीन मागील सेन्सर आणि फिंगरप्रिंट सेन्सर दिले जाऊ शकतात. तसेच कॅमेरा फ्लॅश देखील दिला जाऊ शकतो.
 
Realme Narzo 50A व्यतिरिक्त, Realme Narzo 50i देखील देऊ केले जाऊ शकते. Realme ने त्याच्या अनेक मालिकांच्या फोनमध्ये "i" वर्जन्स सादर केल्या आहेत. उदाहरणार्थ: Realme 8i देखील या आवृत्ती अंतर्गत लाँच करण्यात आले. एका टिपस्टरनुसार, फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज दिले जाऊ शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती