आपण खूप स्वस्त स्मार्टफोन शोधत असाल, ज्याची किंमत तर कमी असावी पण त्याच किमतीत आपल्याला सर्व नवीन फीचर्स हवे असतील तर बाजारात Itel द्वारे आपल्यासाठी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला गेला आहे. या फोनमध्ये आपल्याला फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक व्यतिरिक्त ड्युअल रीअर कॅमेरा मिळेल.
* Itel A46 तपशील - या फोनमध्ये आपल्याला ड्युअल सिम सपोर्टसह 5.45 इंच HD+ डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिझोल्यूशन 720x1440 पिक्सेल आहे. Itel A46 च्या प्रोसेसरबद्दल सांगू तर यात मिडियाटेक 1.6GHz ऑक्टो-कोर प्रोसेसर उपलब्ध होईल, तथापि, कंपनीने प्रोसेसरच्या व्हर्जनची काहीच माहिती जाहीर केली नाही. या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज मिळेल, ज्याला आपण मेमरी कार्डच्या मदतीने 128 जीबी पर्यंत वाढवू शकता.
* Itel A46 बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी - या फोनमध्ये 2400mAh ची बॅटरी मिळेल. या व्यतिरिक्त ड्युअल 4 जी व्हीओएलटीई, अँड्रॉइड पाई, वाय-फाय, ब्लूटुथ आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक मिळेल. आपल्याला फोनसह बॉक्समध्ये एक कव्हर देखील मिळेल.
* Itel A46 किंमत आणि ऑफर्स - Itel A46 ची किंमत 4,999 रुपये आहे आणि हा फोन डार्क वॉटर, ग्रेडियंट डायमंड ग्रे, फियरी रेड आणि नियॉन वॉटर कलर व्हेरिएंट्समध्ये मिळेल. लॉन्चिंग ऑफर्सबद्दल सांगायला गेलो तर या फोनसह, जिओकडून 50 जीबी डेटा आणि 1,200 रुपये कॅशबॅक मिळेल. यासह कंपनी 100 दिवसांची स्क्रीन रिप्लेसमेंट गारंटी देत आहे.