OnePlus Nord CE 3 Lite 5G किंमत आणि फीचर्ससह इतर माहिती

मंगळवार, 14 मार्च 2023 (15:52 IST)
OnePlus कथितपणे त्याचा नवीन नॉर्ड-ब्रँडेड फोन OnePlus Nord CE 3 Lite, Nord CE 3 आणि Nord 3 यावर काम करत आहे. या स्मार्टफोन्सबाबत आतापर्यंत अनेक अफवा आणि लीक समोर आल्या आहेत. अलीकडेच एका विश्वासार्ह स्त्रोताने मॅक्स जॅम्बोरने एका ट्विटमध्ये असे सांगितले Nord CE 3 Lite ची घोषणा 4 एप्रिल रोजी केली जाईल. Nord CE 3 Lite बद्दल जाणून घ्या-
 
OnePlus Nord 3 जुलैमध्ये येण्याची अपेक्षा आहे, जी OnePlus Ace 2V ची पुनर्ब्रँडेड आवृत्ती म्हणून येण्याची शक्यता आहे, जी अलीकडेच चीनमध्ये सादर केली गेली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये OnePlus Nord CE 3 ची स्पेसिफिकेशन शीट शेअर केली गेली होती. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट दिले गेले होते.
 
मात्र नुकत्याच आलेल्या एका अहवालात असे दिसून आले आहे Nord CE 3 मध्ये Snapdragon 782G असणार. अशात दिसून येत आहे की SD695 वर चालणारा हा फोन Nord CE 3 Lite रुपात मार्केटमध्ये एंट्री करेल. वनप्लसचा लाइट व्हेरिएंय 4 एप्रिल रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे तर Nord CE 3 आणि Nord 3 या वर्षीच्या तिसर्‍या तिमाहीत येऊ शकतात.
 
OnePlus Nord CE 3 Lite 5G अपेक्षित स्पेसिफिकेशंस
OnePlus Nord CE 3 Lite 5G मध्ये 6.7 इंची IPS LCD डिस्प्ले. पंच होल डिझाइन असलेल्या या डिस्प्लेला FHD+ रेजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट प्रदान करेल. स्मार्टफोनमध्ये फ्रंटला 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा तर रिअरमध्ये 108 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा दिला जाणार आहे.
 
OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 695 चिपसेट दिली जाणार. बॅटरी बॅकअप बद्दल बोलाचये तर 5,000mAh बॅटरीने लैस असणार 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार. हा स्मार्टफोन Android 13 OS वर बेस्ड OxygenOS 13 UI वर काम करेल. सेफ्टीसाठी साइड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर दिलं जाणार आहे. स्टोरेज ऑप्शन बद्दल सांगायचे तर Nord CE 3 Lite स्मार्टफोन 8GB RAM/128GB आणि 12GB RAM/256GB स्टोरेज ऑप्शन मध्ये येणार.
pic: social media

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती