लेनोवो स्वामित्व असलेली कंपनी मोटोरोला इंडियाने भारतात आपला नवीन स्मार्टफोन मोटो जी7 (Moto G7) लॉन्च केला आहे. मोटो जी7 ची विक्री भारतात लाँचिंगसह मोटो हब, फ्लिपकार्ट आणि दुकानांमध्ये सुरू झाली आहे. Moto G7 मागील वर्षी लॉन्च झालेल्या Moto G6 चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. आता जी7 सीरीज अंतर्गत कंपनी लवकरच मोटो जी7 प्लस, जी7 पॉवर आणि मोटो जी7 प्ले लॉन्च करेल.
मोटो जी7 बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी
या फोनमध्ये 3000 mAh ची बॅटरी मिळेल जी टर्बो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनसोबत 15 वाट फास्ट चार्जर देखील मिळेल. कंपनीने दावा केला आहे की 15 मिनिट चार्जिंगमध्ये या फोनची बॅटरी 9 तासापर्यंत बॅकअप देईल. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4जी व्हीओएलटीई, ब्लूटूथ 4.2, वाय-फाय, डुअल सिम सपोर्ट मिळेल. या फोनची किंमत 16,999 रुपये आहे.
या फोनव्यतिरिक्त कंपनीने मोटो वन देखील प्रस्तुत केला आहे ज्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर, डुअल रिअर कॅमेरा आणि 5.9 इंच डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये देखील फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनची किंमत 13,999 रुपये आहे. दोन्ही फोनसह जिओकडून 2,200 रुपये कॅशबॅक आणि एक्सट्रा डेटा मिळेल.